खेडभोसेच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन पवार बिनविरोध
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) खेडभोसे (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन अर्जुन पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे - पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत उपसरपंच अश्विनी पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदासाठी आज खेडभोसे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी सरपंच सुरेखा देवळे, मावळत्या उपसरपंच अश्विनी पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी सुमन पवार यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक श्री. गायकवाड यांनी उपसरपंचपदी सुमन पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीवेळी सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव पवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी मा का प्रधिनिधी बंडू पवार हणमंत पवार, सिध्देश्वर पवार, संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पांडुरंग पवार, सिध्देश्वर पाटील, विकास पवार, पोपट पवार, , सागर क्षीरसागर, सत्यवान जाधव, शहाजी जमदाडे, सरपंच प्रतिनिधी संजय देवळे, शुभांगी साळुंखे, जयश्री सुतार, पुष्पा बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.