भालेवाडी ग्रामपंचायत विविध विकास कामात सहकार्य करणार :- एसटी आगार प्रमुख संजय भोसले, मंगळवेढा एस टी आगार व्यवस्थापकाच्या वतीने दखल
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) तालुक्यातील भालेवाडी ग्रामपंचायतीस मंगळवेढा एसटी आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले व त्यांच्या सुविध पत्नी भोसले मॅडम यांनी 14 जानेवारी 2024 रोजी भेट देऊन भालेवाडी ग्रामपंचायत राबविलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली त्या दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या कामांचे भरभरून स्तुती केली. व भालेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. व भालेवाडी ग्रामपंचायत विकास कामात नेहमीच हातभार लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भालेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मा.भोसले व त्यांच्या पत्नी सौ .भोसले यांचा स्वागत पर सत्कार डोणज ग्रामपंचायतच्या सरपंच किर्ती केदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भालेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.श्रीकांत दवले, रमेश काटकर, मंगळवेढा आगारातील कर्मचारी गणेश गवळी,वाहक ईश्वर आठवले, ग्रामपंचायत कर्मचारी आप्पा घाडगे, निखिल भोरकडे, विशाल दवले,पीयुष दवले, निखिल दवले, तुकाराम इंगळे, हनुमंत दवले, गणेश सलगर,तेजस दवले, श्रेयस दवले, तन्मय दवले व भालेवाडी गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.