मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात क्रीडा सप्ताहास उत्साहाने सुरुवात....

मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात क्रीडा सप्ताहास उत्साहाने सुरुवात....

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपुरातील मातोश्री ईश्वराअम्मा विद्यालयात क्रीडा सप्ताहाची मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली .यावेळी बोलताना खेळामुळे विश्लेषण कौशल्य बरोबर विचारशक्ती सुधारून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते असे प्रतिपादन प्राचार्य सौदागर झांबरे यांनी केले.श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय पंढरपूर या प्रशालेचा 2023 क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ दिनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले .

प्रारंभी क्रीडा ज्योतीचे दीपप्रज्वलन फॅन्सी रे सांगलीचे मालक उद्योगपती  रणजीत सावंत यांचे शुभहस्ते करून क्रीडा सप्ताहाची सुरुवात केली.
 
यामध्ये सामूहिक ,वैयक्तिक खेळाबरोबर कवायत, मनोरे यांचाही यामध्ये समावेश असल्याचे प्रास्ताविकात क्रीडा शिक्षिका सरदार कुमुदिनी मानसिंग यांनी सांगितले. यावेळी प्रशालेची विद्यार्थिनी आकांक्षा खोत हिने प्रशालेस मुलांना खेळासाठी दोरी उड्या भेट दिल्या .

खेळ व खेळाचे महत्व सांगताना प्राचार्या नंदिनी गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ आणि विकास यासाठी खेळ आवश्यक असून विद्यार्थीदशेतच खेळामुळे नेतृत्व, जबाबदारी, संयम शिकण्यास मदत होऊन यातूनच मुलांच्या बौद्धिकतेचा विकास होतो असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, सविता लोखंडे फरहाणा कादरी यांचे सह सृष्टी लोंढे ,निकिता कदम या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.