पालघरमध्ये केमिकलने भरलेला टँकर उलटला; राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी..

पालघरमध्ये केमिकलने भरलेला टँकर उलटला; राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी..

********************************************************
पालघर;प्रतिनिधी:- पालघर जिल्ह्यात केमिकलने भरलेला टँकर उलटल्याने राज्य महामार्गावर काही तास वाहतूक ठप्प झाली. पोलीस आणि अग्निशिन दलाने योग्य ती खबरदारी घेऊन कोणताही धोका नसल्याची खात्री केली.

काही काळ ठप्प झालेली वाहतूक त्यानंतर सुरळीत सुरु झाली असे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी घडली. प्राप्त माहितीनुसार, ही घटना बोईसर चिल्लर रस्त्यावर सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅंकचे मात्र मोठे नुकसान झाले, पालघर पोलिस पीआरओ सचिन नावडकर यांनी पीटीआयला सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, रंगांच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे रसायन घेऊन जाणारा टँकर मुंबईहून तारापूरकडे निघाला होता. दरम्यान, हा टँकर वारंगडे गावात उलटला. टँकर रस्त्यावरून हटेपर्यंत दोन तास राज्य महामार्गावर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.