विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कृतीक सामाजिक क्षेत्रामध्ये भाग घेणे गरजेचे :- गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये भाग घेणे गरजेचे असल्याचे मत पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांनी विचार व्यक्त केले. ते पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज गादेगाव येथे स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर सामाजिक क्षेत्राचे व सांस्कृतिक क्षेत्राची ओळख असणे गरजेचे आहे विद्यार्थी दशेमध्येच सांस्कृतिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेऊन आपली कला सादर करता येते .प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी वेगळे गुण असतात ते गुण प्रत्यक्षात सादर करण्यासाठी प्रत्येक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केल्यास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉल शिवरत्न मधील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करून वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडले.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक विविध गीते रिमिक्स गीतं गाणी शिक्षणावर आधारित गाणी लावणी अशा विविध प्रकारच्या गाण्यांवर कला सादर केली. यावेळी लहान चिमुकल्यानी विविध वेश परिधान करून आपली कला सादर केली.
यावेळी कार्यक्रमासाठी सरपंच दिपाली बागल ,उपसरपंच लता हुंडेकरी, माजी उपसभापती विष्णू बागल ,माजी सरपंच विकास भोसले, हरिदास बागल ,गोरख नाना बागल, हनुमंत बागल, शिवाजी गडदे ,रवींद्र बागल ,औदुंबर कांबळे ,शांतिनाथ शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा मोरे, शितल मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक राजेंद्र भोसले ,दीपक देशमुख ,नियाज मुलाणी ,सोमनाथ भुईटे ,संतोष पवार, शितल बागल, लीना बागल ,नसरुद्दीन पटेल ,सीमा रकटे, अजय मोरे आदींनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनास गादेगाव व पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी केले नागेश कांबळे यांनी आभार मानले.