पंढरपूरात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर.....

पंढरपूरात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर.....

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : देशाचे नेते मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, भावी पिढी घडवणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कला, क्रीडा, लेखक, कृतिशिल, लेखनिक अशा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना आमदार रोहितदादा पवार, मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार अरुण आण्णा लाड, आमदार यशवंत (तात्या) माने, मा.आमदार दत्तात्रय सावंत सर या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे, श्री. कुंडलिक पवार, सौ. कवडे के.डी., श्री. हणमंत शिराळ, श्री. राजेश पवार, श्री.युवराज काळे, श्री. रमेश देठे, श्री. संतोष कुंभार, सौ. राजश्री पवार, सौ. यास्मिन तांबोळी, श्री. कांतीलाल वाघमारे, प्रा. दत्तात्रय काळेल हे मान्यवर या पुरस्काराचे मानकरी असतील तर न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी व जि.प.प्राथ.शाळा, मुंढेवाडी या आदर्श शाळा ह्या पुरस्काराच्या मानकरी ठरणार आहेत.