पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील सोमवारी दि.३ रोजी पंढरपुर दौऱ्यावर..

पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील सोमवारी दि.३ रोजी पंढरपुर दौऱ्यावर..

---------------------------------------------------------------------------------


पंढरपूर;(प्रतिनिधी):- जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हा त्यांचा पहिला दौरा असल्याने ते प्रथम सोमवार दिनांक ३ रोजी पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. मंगळवारी सकाळी ९:०० वाजता ते श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेणार आहेत.

त्यानंतर सकाळी १०:३० वाजता त्यांचे ४ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे आगमन होणार आहे. असून छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मा स्मारक, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील ,त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतील ,त्यानंतर विविध खात्याच्या आढावा बैठकीत घेणार आहेत.
तसेच पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण व बैठक घेणार आहेत. दुपारी १:०० वा. हेरिटेज मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतल्यानंतर ती पुन्हा नियोजन भावनांमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. असे पालकमंत्री यांच्या दौऱ्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.