वाखरी येथिल छोरिया प्राॅप्रर्टीजमधिल प्लॉट धारकांच्या अडचणीत होणार वाढ..

वाखरी येथिल छोरिया प्राॅप्रर्टीजमधिल प्लॉट धारकांच्या अडचणीत होणार वाढ..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहरालगत असलेल्या वाखरी येथिल अनंता बाबू कैकाडी माने यांची व त्यांच्या मुलांच्या नावे असलेली गट नं ४१७/१, ४१७/२, ४१७/३ ही २१ हेक्टर ०१ आर अशा जवळपास ५२ एकर शेतजमीनीचा व्यवहार छोरिया प्राॅप्रर्टीज ॲण्ड डेव्हलपमेंट कंपणीचे भागिदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी १,६२,७४,५०० रुपयांना पंढरपूर येथिल सह दुय्यम निबंधक वर्ग २ पंढरपूर १ या ठिकानी २३/३/२००७ रोजी झाला होता सदर व्यवहारांमध्ये आपली फसवणूक झाल्याची तक्रार कैकाडी माने यांनी केली होती.

त्यासंदर्भात आजही महसूल विभाग व न्यायालयात  वादविवाद सुरु आहे परंतु ही शेतजमीन शासणाच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करून बिनशेती केली असल्याने यश जमिनीचा बिनशेती आदेश रद्द करण्याबाबत कैकाडी माने यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टाकडे रीतसर कागदपत्रांसह अपील दाखल केले आहे यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की मे.छोरिया प्रॉपर्टीज अँड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन हे सदर वादविवाद सुरु असलेल्या शेतजमिन क्षेत्रातून ४० मिटर रुंदीचा उजणी कालवा गेलेला असताना त्यास बिनशेती करताना हा उजनी कालवा लेआऊटमध्ये फक्त ०५ मीटरचाच दाखवण्यात आला व यातील उर्वरित ३५ मीटरवरील उजनी कालव्याच्या हद्दीत प्लॉट पाडून ते नागरिकांना त्याची विक्री करून त्यांचीही फसवणूक करत आहेत त्यामुळे सदर बिनशेती आदेश रद्द करण्यात यावा असे अपिल सागर माने यांनी त्यांच्या वकिलांमार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केले असल्याची माहिती त्यांनी दिली.