पंढरपुर शहरातील चुकीचा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे - माजी नगरसेवक किरणराज घाडगे आक्रमक..

पंढरपुर शहरातील चुकीचा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे - माजी नगरसेवक किरणराज घाडगे आक्रमक..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहर विकास आराखडा जो चुकीच्या पद्धतीने बनवला आहे तो रद्द झाला पाहिजे त्यामध्ये सुधारणा करून व्यापारी आणि नागरिकांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठीचा नवीन विकास आराखडा तयार करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी शहरातील सर्वपक्षीय .विविध संघटना यांच्या मोर्चा समवेत एका निवेदनाद्वारे केली .या विविध मागण्यासाठी पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर नामदेव पायरी जवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगरपालिकेवर व्यापारी आणि नागरिक यांचा मोर्चा काढून हा आराखडा रद्द करावा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी गजानन गुरव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आले.

यावेळी कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भाऊ कोळी, नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक महादेव धोत्रे ,नगरसेवक संजय बंदपट्टे ,मी वडार अध्यक्ष दत्ता भोसले ,मा नगरसेवक महमद उस्ताद ,मा नगरसेवक धनंजय कोताळकर, मा नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर ,  ,मा नगरसेवक सतीश अप्पा शिंदे,नागेश काका भोसले, युवक नेते प्रणव परिचारक,समता परिषद नेते अनिल अभंगराव ,नगरसेवक लक्ष्मण पापरकर, मा नगरसेवक विवेक बेणारे ,मनसे व्यापार जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले ,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,वीर महाराज, नाना कवठेकर, बाबा महाजन जिल्हा उप प्रमुख साईनाथ बडवे मनसे उपप्रमुख गणेश पिंपळनेरकर,युवक नेते ,नगरसेवक विक्रम पापरकर ,अनिल अभंगराव, शैलेश बडवे, ऋषी उत्पात,नागेश इंगोले, श्रीकांत हरिदास ,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय घोडके, ओंकार देवडीकर, गणेश लंके, वैभव बडवे ,मंगेश मंजुळ इत्यादी उपस्थित होते.