श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण.
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ):- मौजे कुंजीरवाडी, (ता. हवेली) येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख 91 हजार 110 इतकी आहे.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने श्री तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.