सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ अधिवेशन उत्साही वातावरणात संपन्न..
---------------------------------------------------------------------------------
पुणे ग्रंथालय संचालक :- दत्तात्रय क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : वाचन संस्कृती टिकवण्याकरिता राज्य शासनाच्या अख्यतारीतील ग्रंथालय संचनालय दरवर्षी राज्यभरातील ग्रंथालयांना अनुदान घेत असते. या क्षेत्रातील कर्मचारी कार्यकर्ते हे मनापासून काम करीत आहेत. आपल्या हक्काची मागणी करत असताना कर्तव्यात कसं होणार नाही याची दक्षता घेणे हे तितकेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षिरसागर यांनी व्यक्त केले. ग्रंथालय संघाचे ४६ वे अधिवेशन रविवारी सोलापुरात मोठ्या उत्साहात घेण्यात आले. अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रंथालय संचालक क्षीरसागर बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर प्राचार्य हरिदास रणदिवे होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेवार सोलापूर जिल्हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष कुमार जाधव. सहाय्यक ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील .सोलापूर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार .कवयित्री वंदना कुलकर्णी .ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे. ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे . ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील .कार्यवाहक साहेबराव शिंदे(मंगळवेढा), सहसचिव अन्सार भाई शेख (पंढरपूर ) .प्रकाश शिंदे. शैलशिल्पा जाधव (अक्कलकोट), उपस्थित होते.
यावेळी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांची सोडू नको होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने साहित्य संमेलना दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी देत असताना ग्रंथालयात चळवळीकडे सुद्धा लक्ष द्यावे असे असे सांगून गेल्या ३० ते ३५ वर्षापासून राज्यात गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम राबवण्याकरिता ग्रंथालय कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशील आहेत त्या मानाने त्यांना मिळणारे वेतन कमी आहे अनुदानही कमी आहे .अतिशय तटकंज वेतनात कर्मचारी काम करत आहेत मध्यंतरी काहींनी आत्महत्या केली आहेत. शासनाने अधिक अंत न पाहता ग्रंथालय चळवळीला ऊर्जीत अवस्था मिळवून द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटीवर यांनी व्यक्त केली खुल्या अधिवेशनाद्वारे ग्रंथालय चळवळीतील विविध विषयावर उहापोह करण्यात आला.