श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे कविवर्य वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिना निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दैनिक,पंढरी नगरी न्यूज )श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज दिनांक २७/०२/२०२५ गुरुवार रोजी सकाळी ठिक ११-०० वाजता कवीवर्य वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिना निमित्त मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
प्रथमतः वि.वा.शिरवाडकर यांच्या फोटोचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ,रूपेश कांकरिया,प्रमोद भंडारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद नितीन पोपळघाट,विश्वास पाटील,आझर शेख,युनुस बागवान,अनिल मुसळे, वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहा.ग्रंथपाल पल्लवी तौर,क्लार्क विरज पतंगे हे उपस्थित होते अनिल मुसळे सर यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन व आभार वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केलं