सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दि. 26 रोजी सोलापूर बंदची हाक

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने  मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दि. 26 रोजी सोलापूर बंदची हाक

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाज यांचे कडून सर्व समाज बांधवाना जाहीर आवाहन करणेत येते की, मराठा आरक्षणाच्या लढ्यात मराठा समाजाचे एक सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व मनोजदादा जरांगे - पाटील यांचे वर्षभरातील सहावे आमरण उपोषण गेली 8 दिवसापासून सुरू आहे . जरांगे - पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. परंतु सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे जरांगे - पाटील व मराठा समाजाच्या संयम व सहनशीलतेचा अंत पहात आहे. व समाजाची अवहेलना करत आहे . या निष्ठूर व निर्दयी सरकारचा निषेध व मनोज दादा जरांगे यांचे समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करणेत येते की, आपण गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या बंदमध्ये सर्व शासकीय , अशासकीय व खाजगी आस्थापना यांनी बंदला पाठिंबा देवून खुलेपणाने सहभागी व्हावे . असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.