आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात?? भूम - परांडा विधानसभा मतदारसंघात यंदा घडणार चमत्कार

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??  भूम - परांडा विधानसभा मतदारसंघात यंदा घडणार चमत्कार

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत त्याच भूम परंडा मतदार संघात सावंत साहेब सध्या रेड झोन मध्ये आहेत… बंडाळी करून मंत्रीपद दिमाखात मिरवणाऱ्या सावंतांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता राहुल भैया फिरसे… या घोषणेच्या… नावाच्या… मागे ठाकरे - पवारांनी ताकद लावायला सुरुवात केलीय…एका वाक्यात सांगायचं झालं तर इच्छुकांची याही टर्मला भूम परांडा विधानसभा मतदारसंघात भाऊ गर्दी असली तरी वारं मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, एवढं मात्र नक्की… बाकी ज्यानं निवडून दिलं तोच मतदारसंघ रिस्की बनल्यामुळे आता तानाजी सावंत निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार का? सावंत नसतील तर भूम परंड्याचा मतदार संघात मशालीचा की तुतारीचा उमेदवार आमदारकीचा गुलाल उधळतोय? पहावे लागणार आहे.