बार्शी येथील कर्मवीर ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे भारतीय घटनेचेशिल्पकार,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न, युगप्रवर्तक,प्रज्ञावंत,प्रज्ञासुर्य,महामानव,बोधिसत्व,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले,या निमित्ताने त्यांचे प्रतिमेसमोर त्यानी लिहलेले भारतीय संविधान माहितीसाठी ठेवण्यात आले होते यावेळी पांडुरंग आस्वदे,कमलेश जाधव,सोमनाथ गायकवाड,किशोर भगत,सुरज काळे,हनुमंत तुपे आदीसह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.