बार्शी येथे विविध संस्थांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव साजरा..

बार्शी येथे विविध संस्थांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव साजरा..

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दैनिक,पंढरी नगरी न्यूज) : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय व मराठा एकता मंडळ,छत्रपती कॉलनी बहुद्देशीय मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने रयतेचे राजे,कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमता सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ.भरत गायकवाड,कर्मवीर ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.जयकुमार(बापूसाहेब)शितोळे यांचे शुभहस्ते छत्रपतीच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर छत्रपतींची सामुहिक आरती घेण्यात आली.

त्यावेळी कार्यवाह मधुकांत ठोकळ,मराठा मंडळाचे सुखदेव दिवटे,राजूभैय्या राऊत,संजय राऊत,बाळासाहेब पवार, इंजिनिअर मा.हेमंत जाधव,प्रा.किरण गाढवे सर,मा.बापू गव्हाणे आदी उपस्थित होते.यावेळी छत्रपतींच्या इतिहासावर चि.सार्थक मस्के,चि.श्लोक मस्के,चि.सोहम देशमुख,चि.उत्कर्ष उमाकांत ठोकळ,चि.सुश्रूत राऊत या बालमावळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली.त्यानंतर या औचित्याने छत्रपतींचा जांज्वल्य इतिहास प्रा.किरण गाढवे सर यांनी मांडला.

या कार्यक्रमासाठी प्रेम अग्रवाल,प्रसाद बारबोले,राहुल लोंढे,नितीन गव्हाणे,विवेक कदम,सौरभ घाडगे,अक्षय पोकळे यांचेसह सभासद,वाचक व बालवाचक आदी उपस्थित होते.यावेळी कर्मवीर ग्रंथालयाचे सभासद चि.विवेक विठ्ठल कदम यांची सरळ सेवेमधून सांगली जिल्हा परिषद येथे लेखा अधिक्षक म्हणून निवड झालेबद्दल ग्रंथालयाचे वतीने मोत्याची माळ व ग्रंथभेट देवून अध्यक्ष जयकुमार शितोळे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले तर आभार मा.सुखदेव दिवटे यांनी मानले.