धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळचा संघ ठरला बार्शीचा कर्मवीर खो - खो चषकाचे मानकरी

धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळचा संघ ठरला बार्शीचा कर्मवीर खो - खो चषकाचे मानकरी

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दैनिक,पंढरी नगरी न्यूज )श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी, महाराष्ट्र खो- खो असोसिएशन व सोलापूर खो - खो असोसिएशन यांच्या वतीने दिनांक २ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत विभागीय निमंत्रित खो - खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंतिम सामन्यात धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ विरुद्ध किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर सामना खेळला गेला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाच्या संघाने कर्मवीर खो खो २०२५ चषकाचा मानकरी ठरला.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, संस्थेचे सहसचिव ए पी देबडवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ .बी वाय यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. एस एस गोरे, अजितकुमार संगवे, श्रीकांत ढेपे, क्रीडा अधिकारी सत्यम जाधव, रामजी कश्यप, प्रदीप लोंढे, स्मिता बुरगुटे, अप्पांच्या करामती फेम, अमृत नाना राऊत, स्पर्धा निरीक्षक प्रवीण बागल, राजाभाऊ शिंदे, माजी प्राचार्य डॉ .सी एस मोरे, श्री. व्ही एस पाटील, डॉ .दिलीप मोहिते, डॉ. एस एम लांडगे, स्पर्धा सचिव डॉ .एस एस मारकड आदी उपस्थित होते. 

या स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातील एकूण आठ संघ सहभागी झाले होते. यावेळी अक्षय इंगळे या खेळाडूने मनोगतातून भोजन, निवास,मैदान व तांत्रिक बाबीबद्दल समाधान व्यक्त केले. श्रीरंग बनसोडे यांनी पंच म्हणून मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. चंद्रजीत जाधव यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शारीरिक शिक्षण व क्रीडा यातूनच विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी आहेत. क्रीडा व खेळ याकडे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. यातूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना क्रीडा व खेळ विषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी या हेतूने या स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी खेळाडूंची जिद्द व चिकाटी जवळून पाहता यावी विद्यार्थ्यांना टी व्ही व मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्व खेळाडूंना भविष्यात विविध सामन्यात यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली. 

उत्कृष्ट संरक्षक खेळाडू - विजय शिंदे - छत्रपती व्यायाम शाळा, धाराशिव

उत्कृष्ट आक्रमक खेळाडू - अक्षय इंगळे - किरण स्पोर्ट्स सोलापूर

अष्टपैलू खेळाडू - रोहित चव्हाण - छत्रपती व्यायाम शाळा धाराशिव

◼️ प्रथम क्रमांक- छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ धाराशिव (रुपये २१०००/ रोख व ट्रॉफी)

◼️ द्वितीय क्रमांक - किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर - (रुपये १५०००/ रोख व ट्रॉफी )

◼️ तृतीय क्रमांक - श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळ , धाराशिव - (रुपये ११०००/ रोख व ट्रॉफी) 

◼️ चौथा क्रमांक- अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर - (रुपये ५०००/ रोख )

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शरद सावळे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार स्पर्धा सचिव डॉ .एस एस मारकड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता सुरवसे व प्रा. पी पी नरळे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी एम पी एड विभाग प्रमुख डॉ. एस एम लांडगे,बी पी एड विभाग प्रमुख डॉ. ए जी कांबळे, बी एड विभाग प्रमुख डॉ. व्ही पी शिखरे, स्पर्धा सचिव डॉ .एस एस मारकड प्रा. स्मिता सुरवसे, प्रा. पी पी नरळे, प्रा. शरद सावळे, प्रा. के बी चव्हाण, प्रा. स्वप्नील अंधारे, कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विविध समितीचे सदस्य, बी. पी. एड, व एम पी एड विभागाचे प्रशिक्षणार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बार्शी व परिसरातील अनेक क्रीडा प्रेमी, माजी राष्ट्रीय खेळाडू व उदयोन्मुख खेळाडू उपस्थित होते. यावेळी खेळाडूंसाठी यू ट्यूब फेम अप्पांच्या करामती कार्यक्रम सादर करण्यात आला.