50 हजाराच्या लाच प्रकरणी मावळ तालुक्यातील तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

50 हजाराच्या लाच प्रकरणी मावळ तालुक्यातील तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

---------------------------------------------------------------------------------

पुणे (पंढरी नगरी न्यूज ) पोलीसनामा ऑनलाईन शेतीच्या गटाची फोड केल्याची सात-बारा उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 25 हजार रूपयाची लाच घेणार्‍या तलाठयास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहेत.त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरूध्द मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सखाराम कुशाबा दगडे  (52, पद - तलाठी, सजा - करूज, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शेतीच्या गटाची फोड केल्याबाबत 7/12 उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी तलाठी सखाराम कुशाबा दगडे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. सरकारी पंचासमक्ष पडताळणी केली असताना दि. 18 मार्च 2024 रोजी तलाठी सखाराम दगडे यांनी तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 25 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती
पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली आहे.