मौजे पांढरेवाडी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती व सदाशिव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर

मौजे पांढरेवाडी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती  व सदाशिव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दैनिक, पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै .सदाशिव कृष्ण पवार यांच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त गावातील व परिसरातील नागरिकांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायतचे माजी सरपंच दगडू पवार यांनी दैनिक, पंढरी नगरी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील या शिबिरात नागरिकांसाठी कराड येथील सुप्रसिद्ध डॉ .एस जे पाटील हे कॅन्सर, मधुमेह, मूत्रपिंड विकार ,मानसिक आजार ,मेंदू विकार ,श्वसनरोग, पॅरासिस, पोटाचे विकार, व्हायरल डिसीज, पोटाचे विकार, व्हेरिकोज अशा सर्व प्रकारचे अलर्जी व्यसनमुक्ती, मणक्याचे विकार, वजन कमी करणे इत्यादी सर्वरोग निदान शिबिरात सवलतीच्या दरात उपचार केले जातील. तरी गावातील व परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दगडू पवार यांनी केले आहे.