मुंबईत शिंदे शिवसेना गट ग्रंथालय वाचक महिला विभागाच्या वतीने "जागतिक महिला दिनाचे आयोजन, गुणवंत महिला व लाडक्या बहिणीचा सत्कार समारंभ..

मुंबईत शिंदे शिवसेना गट ग्रंथालय वाचक महिला विभागाच्या वतीने "जागतिक महिला दिनाचे आयोजन,  गुणवंत महिला व लाडक्या बहिणीचा सत्कार समारंभ..

------------------------------------------------------------------------------------

मुंबई (दैनिक, पंढरी नगरी न्युज) एकनाथ शिंदे गट शिवसेना ग्रंथालय वाचक संघ महिला विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "जागतिक महिला दिनानिमित्त, गुणवंत महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती संयोजिका शिंदे गटाच्या शिवसेना महिला विभागाच्या अध्यक्षा उज्वला भोसले यांनी दिली. 

मंगळवार दिनांक 18 रोजी 2025 "जागतिक महिला दिनाचे ,औचित्य साधून गुणवंत व लाडक्या बहिणींचा सत्कार पर सन्मान सोहळा करण्यात येऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे .कार्यक्रमाचे ठिकाण मुंबई येथील बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन मुंबई येथे होणार असल्याचे संयोजिका उज्वला भोसले यांनी सांगितले .तरी या कार्यक्रमास राज्यातील सर्व ग्रंथालय विभागातील वाचक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजिका उज्वला भोसले यांनी केले.