श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..

------------------------------------------------------------------------------------

बार्शी दैनिक,(पंढरी नगरी न्यूज ) बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे शुक्रवार दि.10 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे पुजन वाचनालयाचे ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया,व संचालक धिरज कुंकूलोळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मुसळे सर,मते, उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन वाचनालयाचे ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.