बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महात्मा फुले जयंती उत्साहाने साजरी..

बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महात्मा फुले जयंती उत्साहाने साजरी..

------------------------------------------------------------------------------------

बार्शी(दैनिक ,पंढरी नगरी न्यूज ): बहुजन समाजाच्या ऱ्हासाचे कारण केवळ पिढ्यान पिढ्या असणारे अज्ञान हे निक्षून सांगत या समाजाच्या हितासाठी आपली इस्टेटच नाही तर आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे महात्मा फुले हे खरोखरंच क्रांतीसुर्य होते त्यांचा समाजहिताचा वैचारिक वारसा जतन करणे वा पुढे घेवून जाणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे असे विचार वृक्षमित्र तथा गायक सुनिल फल्ले यांनी व्यक्त केले.                      

पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक विचारवंत, बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रथमता क्रांतीसुर्य म.फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुहास बप्पा सुतार हे होते. कार्यक्रमाचे औचित्याने प्रमुख मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश पाचकुडवे, प्रेम अग्रवाल, बुध्दप्रिय कांबळे, अमित कदम, लक्ष्मीकांत सागरे, प्रेम लोंढे यांचेसह सभासद व वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.