एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा ,मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेचे दर्शन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर,( दै.पंढरी नगरी न्यूज ):- राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिवहन मंत्री श्री सरनाईक यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे ,शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश नाना साठे, श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रामचंद्र शेळके ,राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.