पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने हरितमय पंढरपूर उपक्रमाचे आयोजन ◼️ पंढरपूर हरितमय करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व वृक्षप्रेमीनी सहभागी होण्याचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरांमध्ये स्वच्छता हिरवळ व सर्व समावेशक आनंददायक वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शहरात स्वच्छतेच्या बाबतीत आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ पंढरपूर हरित पंढरपूर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पंढरपूर शहरातील खुल्या जागा मध्ये पंढरपूर नगरपरिषद स्थानिक वृक्षप्रेमी संघटना व नागरिकांच्या संयुक्त सहभागातून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याची नियोजन करण्यात आले आहे पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने देशी प्रजातीची जाडी उपलब्ध करून देण्यात येतील झाडांची नियमित देखभाल निगा व संवर्धनाची जबाबदारी शहरातील स्थानिक रहिवाशांनी घ्यावी असे आवाहनही मुख्य अधिकारी रोकडे यांनी केले आहे शहरातील वृक्षप्रेमी संघटना संस्था वसाहती तसेच ज्यांना आपल्या परिसरात नव्याने लागवड झालेल्या झाडांची काळजी घेण्याची तयारी आहे अशा सर्वांनी त्वरित नगर परिषदेच्या कार्यालयातील हाके मॅडम यांच्याशी संपर्क साधावा शहरांमध्ये स्वच्छता स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरण संरक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण बाबीची सर्व कार्यपद्धती द्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि हरित पंढरपूर करिता सर्व सामाजिक विविध संघटना स्थानीकानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.