सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यलगुंडे यांच्या बदलीची कामगारांमधून जोरदार मागणी ◼️ सोलापूर जिल्ह्यात कामगार आयुक्त पदावरून रंगले राजकारण ◼️ सहाय्यक कामगार आयुक्त यांची चौकशी करून कारवाई करणार--, पालकमंत्री जयकुमार गोरे ◼️ सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यावर कारवाईची टांगती तलवार
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांच्या बदलीची अनेक बांधकाम कामगारांमधून मागणी होत असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कामगारांच्या सलुभ सोयीकरता तालुका निहाय कामगार केंद्रे करण्यात आली आहेत परंतु सोलापूर सहा कामगार आयुक्त प्रभारी पद येलगुंडे यांच्याकडे आल्यापासून निलेश येलगुंडे यांनी खऱ्या बांधकाम कामगारांना जाचक नियम अटी लावून नाहक ञास देत असल्याचे बोलले जात आहे तसेच जे खरे बांधकाम कामगार नाहीत त्यांची कामे मात्र एलगुंडे हे एजंटांमार्फत अगदी सुलभ रित्या तात्काळ करून देत असल्याचे दिसूत येत आहे तर अनेक बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकारकडून सेफ्टी किट सेट तसेच भांडीसंच या वस्तु मोफत दिल्या जातात परंतु कामगार आयुक्त कार्यालयाशी जोडले गेलेले अनेक एजंट हे या मोफत दिल्या जाणाऱ्या योजनांसाठी बांधकाम कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे सोलापूर सहाय्यक कामगार प्रभारी आयुक्तपदी असलेले येलगुंडेवार यांची लवकरात लवकर बदली करण्याची मागणी बांधकाम कामगार वर्गातून होत आहे या अगोदरही निलेश यलगुंडे हे सोलापूर कामगार आयुक्त म्हणून काही वर्षे सोलापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते परंतु बांधकाम कामगार संघटनांकडून निलेश यलगुंडे यांनी कशा प्रकारे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला व शासणाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करून जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले व आपल्या आर्थिक फायद्यासाठी जे बांधकाम कामगार नाहीत त्यांना तात्काळ लाभ देण्याचे काम केले गेले होते त्यामुळे येलगुंडे यांची सोलापूर कामगार आयुक्त पदावरून उचल बांगडी करण्यात आली होती परंतु पुन्हा सोलापूर कामगार आयुक्त पदाचा प्रभारी पदभार कोणाच्या आशीर्वादाने यलगुंडे यांना दिला गेला हा प्रश्न बांधकाम कामगार वर्गातून विचारला जात आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असून या सरकारने किंबहुना भाजपने असा नारा दिला होता की ना खाऊंगा ना खाने दूंगा परंतु अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असताना तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडे त्याच जिल्ह्याच्या पदाचा पदाभार देत आहात तर सर्वसामान्य जनतेने याचा नेमका अर्थ तरी काय समजायचा त्यामुळे सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत गांभीर्य दाखवत बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय देण्याची मागणी बांधकाम कामगारांमधून होत आहे अन्यथा कामगार संघटना राज्यभर रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा तीव्र पविञा घेतील तसेच या अगोदरही निलेश यलगुंडे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव आणि नोंदणी, नुतणीकरण व विविध योजनेअंतर्गत अर्ज न स्विकारणे, स्विकारलेले अर्ज दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित ठेवणे, तपासणी न करणे, शासन अनुदान रकमेचे वाटप न करणे लिपीक किर्ती देऊळकर, टी. डी. शेख, महेश लिंबोळे यांचेकडून रकमेची मागणी करणे अशा इत्यादी तक्रारी त्यांच्याबाबत प्राप्त झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती परंतु एवढे रामायण घडूनही त्यांनाच या पदावर ठेवून गोरगरीब बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कावर सोलापूरातील कोणत्या नेत्याला पाणी सोडायच आहे हेही एकदा समोर आले पाहिजे.