पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात सुरू ◼️ सोहळ्यानिमित्त 12 गावात रक्तदान शिबिराचे केले आयोजन ◼️ शिवजन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकार्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ◼️ पोलीस स्टेशनच्या डीजे मुक्त छत्रपती शिवजयंतीस ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज)छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिव जन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिटिंगमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देऊन शिव जन्मोत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्त उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

त्यामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी देखील सहभाग नोंदवला पोलिसांच्या या उपक्रमाला तालुक्यातून कौतुकाची थाप पडत आहे शिव जन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी डीजे वाद्य न लावता अनवली, रांजणी ,बाबुळगाव ,अजनसोंड ,खर्डी ,सरकोली, खरसोळी, लक्ष्मी टाकळी नारायण चिंचोली इ. गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते.
रक्तदान शिबिरामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलिस अंमलदार त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी .वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस हवालदार अभिमन्यू गरड, मंगेश रोकडे ,स्वप्निल वाडदेकर, विनायक नलवडे, तात्या गायकवाड, रमेश बनसोडे, सतीश चंदनशिवे यांनी सहभाग नोंदवला आहे.