आंबे येथील नदीत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पोवर पोलीस पथकाची मोठी कारवाई ◼️ 5 लाख 6 हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त ,आंबे गावातील व परिसरातील शेतकऱ्याकडून पोलीस स्टेशनचे कौतुक ◼️ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची चमकदार कामगिरी

आंबे येथील नदीत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पोवर पोलीस पथकाची मोठी कारवाई    ◼️  5 लाख 6 हजार रुपयांचा   किमतीचा मुद्देमाल जप्त ,आंबे गावातील व परिसरातील शेतकऱ्याकडून पोलीस स्टेशनचे कौतुक  ◼️ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची चमकदार कामगिरी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे भीमा नदीच्या पात्रात दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबे गावातील भीमा नदी पात्रा लागत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम एच 45 ९०९७ या टेम्पोमध्ये टेम्पो चालक गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाची मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपी गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव व महिंद्रा टेम्पो चा मालक यांचे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 305 303 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर आरोपीकडून एकूण एक ब्रास वाळू व महिंद्रा कंपनीचा टेम्पो असा एकूण 5 लाख 6 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे विलास घाडगे ,हसन नदाफ यांच्या पथकाने केली आहे.