श्री. वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे शहिद दिना निमित्त क्रांतिकारकाना विनम्र अभिवादन
------------------------------------------------------------------------------------
बार्शी ( दै.पंढरी नगरी न्यूज)- श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे शहिद दिना निमित्त भारतमातेचे थोर वीर सुपुत्र शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,ऑ.सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक प्रमोद भंडारी यांचे शुभहस्ते करण्यात आले.या वेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते.या सर्वांनी शहीद दिना निमित्त शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरु यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक प्रमोद भंडारी यांनी केले. वाचक ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहा.ग्रंथपाल सौ.शितल लुकडे,क्लार्क विराज पतंगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .