सिताराम महाराज यांच्या खर्डी गावात जुगार खेळताना आठ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले ◼️ पंढरपूरचे डी वाय एस पी प्रशांत डगळे यांची जुगार अड्डयावर जबरदस्त कारवाई १३,६५,१७०/- रू. मुद्देमाल जप्त
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरीन्यूज) पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे दि .३० रोजी पंढरपूरचे विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना येथील खताळ वस्ती येथे काही इसम रमी नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची खबर मिळाल्याने पोहेकॉ/२०४१ सर्जे, पोकों/२११० हुलजंती, पोकों/२०३६ माने, पोकों/६०४ भंडरवाड, पोकों/१२३६ सावंत, पोकों / १३९५ कुचेकर, पोकों/२१०३ साठे, पोकॉ/८३० लोखंडे, पोकॉ/१४९१ सुर्यवंशी, पोकॉ/१४२३ लोंढे यांना सदर ठिकाणी जावून बातमीतील माहीती प्रमाणे खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे इकडील तपास पथकासह वरील पोलीस अंमलदार सदर ठिकाणी गेले असता, त्यांना एका आंब्याचे झाडाखाली मोकळया जागेत लाईटच्या उजेडात काही इसम गोलाकर बसुन रमी नावाचा पत्याचा जुगार खेळत असताना दिसल्याने त्यांना गराडा घालून जागीच पकडले. ती वेळ २०/४५ वा. ची होती, त्यांचे समोरच वेगवेगळया दराचे नोटा पडलेल्या दिसल्या. सदर इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता, १) संतोष सुखदेव खताळ वय ३२ वर्षे रा. खताळवस्ती, खर्डी, ता. पंढरपूर २) फिरोज इलाही आतार, वय ३८ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ३) मारूती नारायण अभिमंत वय ३६ वर्षे, रा.खर्डी, ता. पंढरपूर, ४) समाधान भारत वाकडे वय ३५ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ५) अस्लम दाउद शेख, वय ३२ वर्षे, रा. शेळवे, ता. पंढरपूर, ६) कुलजित मारूती देशमुख वय ४०, रा. कासेगाव, ता. पंढरपूर ७) सिताराम मारूती चव्हाण वय ३८ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ८) दिगंबर लक्ष्मण पवार वय ५५ वर्षे, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर अशी नावे असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता, सदरची जागा संतोष सुखदेव खताळ याचे मालकीची असून सदर जागा जुगार खेळण्याकरीता वापरण्यास दिल्याचे समजले. त्यांच्या कब्जात ११,१७०/-रू. रोख, ०७ मोबाईल, पत्याची पाने, ०२ चारचाकी वाहन, ०३ दुचाकी मोटार सायकल असा एकुण १३,६५,१७०/- रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील आरोपी नं. ०१ ते ०८ यांचेविरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.
सदरची कारवाई पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे , यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/२०४१ सर्जे, पोकों/२११० हुलजंती, पोकों/२०३६ माने, पोकॉ/६०४ भंडरवाड, पोकॉ/१२३६ सावंत, पोकॉ/१३९५ कुचेकर, पोकों/२१०३ साठे, पोकों/८३० लोखंडे, पोकॉ/१४९१ सुर्यवंशी, पोकॉ/१४२३ लोंढे यांनी पार पाडलेली आहे.