पंढरपूरात अवैध गुटखा वाहतुकीवर पोलीस प्रशासनाची कारवाई,एकूण 4 लाख 87 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर जबरी गुन्हा दाखल.

पंढरपूरात अवैध गुटखा वाहतुकीवर पोलीस प्रशासनाची कारवाई,एकूण 4 लाख 87 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर जबरी गुन्हा दाखल.

-----------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):-

पंढरपूर तालुका पोलीसांनी लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपूर) येथे सापळा रचून 87 हजार 900 रुपयांचा अवैध गुटखा व 4 लाख रुपयांची कार गाडी असा 4 लाख 87 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि.6 ऑगस्ट रोजी घडली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी यांच्या आदेशाने अवैध्य धंद्यावरती कारवाई करण्यात येत होती. पंढरपूर तालुका पोलीसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील हॉटेल शाही दरबार जवळ सापळा रचला. एक मारुती सुजुकी कंपनीची चार चाकी गाडी( एम.एच.45 ए.यु 6645) चेक केली असता गाडीच्या डिकीमध्ये व मधल्या सीटवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला (गुटखा) वाहतुक करताना मिळुन आला. चालक श्रीकांत राजेंद्र बळवंतराव (वय 32) रा. सांगोला, तर गाडीतुन उतरून पळुन गेलेला संतोष चांगदेव सुरवसे रा. खारवाटवाडी सांगोला तर ज्याच्याकडून गुटखा आणला तो संतोष डोंगरे रा.इचलकरंजी जि. कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई राजेंद्र गोसावी हे करित आहेत.

सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, पंढरपूरचे सहाय्य पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना बाबासाहेब पाटील, संतोष गायकवाड, पोकॉ विजयकुमार आवटे, मंगेश सुर्वे, सागर गवळी, सुरज देशमुख यांनी केली.