पुणे शिक्षक मतदारसंघात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षकांच्या संपर्कात आघाडीवर. ◾मुख्य लढत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण असणार यांच्यातच काट्याची टक्कर होणार, ◾माजी आमदार सावंत यांनी सोडवलेल्या प्रश्नाची शिदोरी घेऊन हजारो शिक्षक शिलेदार शिक्षक मतदाराच्या संपर्कात.

पुणे शिक्षक मतदारसंघात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षकांच्या संपर्कात आघाडीवर.   ◾मुख्य लढत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व महायुतीचे संभाव्य उमेदवार  कोण असणार यांच्यातच काट्याची टक्कर होणार,  ◾माजी आमदार सावंत यांनी सोडवलेल्या प्रश्नाची शिदोरी घेऊन  हजारो शिक्षक शिलेदार शिक्षक मतदाराच्या संपर्कात.

---------------------------------------------------------------------------

सोलापूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ):-पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीला अद्याप काही महिने अवकाश असला तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक संघटनांच्या बैठका, संपर्क अभियान आणि विविध प्रश्नांवरील आंदोलनांच्या माध्यमातून मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे,
प्रदेश सचिव  तथा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सुरू केले आहे.

गतवर्षी झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार जयंत आसगावकर व माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात चुरशीची निवडणूक होऊन माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सर्व सामान्य शिक्षकाना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर  यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी विविध पक्षांमध्ये उमेदवारीच्या चर्चांना वेग आला आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी TET सक्ती विरोधात आंदोलन केल्यामुळे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांना दिल्ली येथे अटक करण्यात आली होती.
१ सप्टेंबर २०२५ च्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशानुसार भारतातील सर्व एक ते आठ शिकवणाऱ्या शिक्षकांना TET लागू केली. ज्यांची सेवा 20-25 वर्षे झालेले आहे त्यांनाही लागू केली. भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने त्यातून शिक्षकांना सूट दिली परंतु महाराष्ट्र सरकारने कोणत्याही प्रकारचे TET संदर्भात पाऊल न उचलता TET पास व्हावेच लागेल असा आदेश काढला. त्यामुळे लाखो शिक्षकावरती नोकरीची टांगती तलवार आहे.
भारत सरकारच्या शिक्षण विभागास ठोस निर्णय घेऊन  शिक्षकांना TET मधून सूट द्यावीच लागेल असे सांगितले संपर्काच्या निमित्ताने
शिक्षकांच्या मागे राहून खंबीरपणे प्रश्न मांडत आहेत.

हे उपोषण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी तर आहेच पण भारतातील शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करू नये म्हणून होते परंतु पाठीमागचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांना अडचणी आल्या त्या त्या ठिकाणी  माजी आमदार सावंत हे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. अनेक चर्चा, आंदोलने, पायी दिंडी, जीवावर बेतेल अशी उपोषणे सरांनी केलेली आहेत. इत्यादी शिक्षकांचे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने प्रशासनासमोर मांडत आहेत. टप्पा अनुदान आणि पेन्शनच्या प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली असून, या मुद्द्यांवरून त्यांचा मतदारसंघातील संपर्क वाढत आहे.

महायुतीमध्ये मात्र उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे, आणि माणिकराव पाटील-चुयेकर यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंगेश चिवटे यांनीही शिक्षक मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.कौस्तुभ गावडे यांच्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. गावडे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) त्यांना उमेदवारी दिल्याचेही बातमीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कौस्तुभ गावडे यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनीही मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे. चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा अधिक रंगली आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य उमेदवारीवरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा शिक्षक कृती समितीचे प्रदेश सचिव  माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि खंडेराव जगदाळे हे ही आपापल्या पातळीवर निवडणुकीची तयारी करत आहेत. या दोघांनीही मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याने शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे होताना दिसत आहे.पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून कौस्तुभ गावडे, मंगेश चिवटे, आणि माणिकराव पाटील-चुयेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रा. सागर देवकर यांच्याभोवती राजकीय हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत निवडणुकीची  जोरदार मोर्चे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच इच्छुकांची फिल्डिंग वाढली असून, महायुतीत उमेदवारी कोणाला मिळणार आणि महाविकास आघाडी कोणता चेहरा मैदानात उतरवणार, याकडे आता शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.