श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व "शिक्षक दिन" उत्साहाने साजरा.
----------------------------------------------------------------------------
बार्शी, (दै.पंढरी नगरी न्यूज):- बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज दिनांक ०५रोजी शनिवार रोजी सकाळी ठिक ११-३० वाजता डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.प्रथमतः डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया,व संचालक धिरज कुंकूलोळ श्री जैनाश्रमचे माजी अध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी स्नेहल कुंकूलोळ वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते.प्रास्ताविक व सुत्रसंचालन वाचनालयाचे सेक्रेटरी आनंद पुनमिया यांनी केले.तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहा.ग्रंथपाल शितल लुकडे क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.