पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रुक्मिणी मूर्ती वज्रलेप कामाची. ◾जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून पाहणी.k
-------------------------------------------------------------------------
पंढरपूर:-(दै.पंढरी नगरी न्यूज):-श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम सुरू आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप प्रक्रिया करण्यात येत असून,या वज्रलेप कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केली.

यावेळी त्यांच्या समवेत मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी महाराज मोरे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. एस विनोद कुमार, डॉ. विमल जयस्वाल, निलेश महाजन, आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठल मूर्ती संवर्धन प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. मूर्तीच्या प्राचीन स्वरूपास, पावित्र्यास अथवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन श्रींच्या मूर्तीस वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी दिल्या. तसेच यावेळी श्री विठ्ठल सभा मंडप येते मंदिर समितीकडून स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आली.
मुर्तीचे लायडर स्कॅनिंग -
विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीवर वज्रलेप करताना अगोदर मुर्तीचे लायडर स्कॅनिंग करण्यात आले आहे. हे स्कॅनिंग भविष्यात कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेकरीता महत्वाचे ठरणार आहे. मूर्तीची डिजीटल ट्वीन तयार करण्यात आली आहे. यामुळे मुर्तीची झीज होत आहे की नाही, झाली तर नेमकी कोणत्या ठिकाणी झाली. हे समजणार आहे. मुर्ती हाताळताना पुजाऱ्यांना पुरातत्व विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाकडून लायडर स्कॅनिंगचा अहवाल सल्लागार समितीला १२ दिवसात देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी दिल्या विविध गणेश मंडळांना भेटी
जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज पंढरपूर येथील गणेश सेवा गणेश उत्सव मंडळ, शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, न्यू छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ व सहकार गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणेशाची मनोभावे आरती केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इतापे उपस्थित होते.