मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कृषी सहलीचे आयोजन..

मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कृषी सहलीचे आयोजन..

---------------------------------------------------------------------------------
                

मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंचभौतिक महोत्सव कणेरी मठ कोल्हापूर येथे माननीय काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली  पाचशे एकर जमिनीवर दिनांक २० फेब्रुवारी ते २६  फेब्रुवारी २०२३ मोठा कृषी महोत्सव ठेवण्यात आला आहे.तरी मारापुर मधील सर्व शेतकरी बांधव, तरुण मित्र, महिलावर्ग आपण दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता आपल्या ग्रामपंचायत मारापुर या ठिकाणाहून सदर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जाणार आहोत.

यामध्ये १  बस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  आपणास दुग्ध व्यवसाय , कुक्कुटपालन, शेळी ,मेंढी पालन ,विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या बियाणे , ऊस शेतीतील तंत्रज्ञान, तसेच सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळणार आहे .त्यातून मिळणारे उत्पादन आपल्याला पहावयास मिळणार आहे व त्यामधून भरपूर गोष्टी शिकावयास मिळणार आहेत. जवळ जवळ २०० आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कमीत कमी ५  ते ६  लाख लोकांची रोज हजेरी त्या ठिकाणी राहणार आहे. असा देशपातळीवर पहिला प्रयोग कणेरी मठ कोल्हापूर येथे होत आहे. हे सर्व पाहण्याची सुवर्णसंधी मारापुर ग्रामस्थांना ग्रामपंचायत मारापुर यांचे वतीने मोफत आयोजीत केलेल्या शेतकरी सहल या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. तरी सर्वांना आवाहन करण्यात येथे की,ज्यांना या कृषी प्रदर्शन साठी जावयाचे आहे त्यांनी  दि.१५ /२/२०२३ पर्यंत आपले आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर  घेऊन आपली नाव नोंदणी ग्रामपंचातींमध्ये येवुन, लोकसेवक अशोक  आसबे, उपसरपंच मारापुर यांच्याकडे करण्यात यावी,

( ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी व त्याचे मार्केटिंग कसे करायचे यासाठी ही शेतकरी कृषी सहल ग्रामपंचायती मार्फत मोफत आयोजित केली आहे.)
            
विनायक, यादव ,सरपंच ग्रामपंचायत मारापुर  ,ता. मंगळवेढा