*तावशी येथील प्रशांतराव परिचारक ग्रामीण पतसंस्थेने दीपावलीसाठी सभासदांना लाभांश वाटप करणार:-चेअरमन बापूराव वगैरे.*
------------------------------------------------------------------------------- *पंढरपूर,(प्रतिनिधी):-* तालुका पंढरपूर येथील प्रशांतराव परिचारक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थेची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन बाबुराव वगैरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून यंदाच्या दीपावली सणासाठी सभासदांना ७/ टक्के लाभांश करणार असल्याची माहिती बापूराव वगरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.
येथील प्रशांतराव परिचारक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११:०० वा. बिरोबा देवस्थान कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल वगरे हे प्रमुख उपस्थित होते .यावेळी शाखेचे व्यवस्थापक तानाजी टिकोरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सभासदांना संस्थेकडे असणारे भाग भांडवल नफा - तोटा इत्यादी माहिती सर्व सभासदांपुढे मांडली यावेळी संस्थेचे संस्थापक अनिल वगरे यांनी सांगितले की सभासदांनी आपले व्यवसाय करता संस्थेकडून कर्ज घेऊन ते मुदतीत पूर्ण रकमेची कर्जफेड केल्यामुळे या संस्थेवर सभासदांचा अधिक विश्वास असल्याने ती पात्र असल्यामुळे पतसंस्थेची प्रगती झाली असल्याचे सांगून सध्या पतसंस्थेकडे कर्मचारी सभासद चांगल्या पद्धतीने काम करीत असून संस्थेकडे एकूण ठेवी १ कोटी ६३लाख असून चालू नका २ लाख वर व संस्थेची उलाढाल ७ कोटी पर्यंत असल्याचे या पतसंस्थेचे नाव इतरही आसपासच्या गावांमध्ये गरीब होतकरू व्यवसाय करणाऱ्या गरजू सभासदांना कर्ज देऊन नावारूपास आणावे असे संस्थापक अनिल वगरे यांनी सभेत सांगितले.
प्रथमता या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी व्हॉइस चेअरमन गणपत नाना पिसे व काही इतर सभासद यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्याबद्दल त्यांना सर्व सभासदांनी उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली .
सभेस संस्थेचे व्हाईट चेअरमन, संचालक, कर्मचारी, ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना अल्पपहार देऊन सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.