सरकोली भीमा नदीच्या पात्रातून दोघे वाळू तस्कर पोलिसांच्या ताब्यात

सरकोली भीमा नदीच्या पात्रातून दोघे वाळू तस्कर पोलिसांच्या ताब्यात

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदी पात्रातून अवैद्यरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू वाहतूक करणाऱ्या दोन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सरकोली येथील भीमा नदीच्या नदीपात्रात गेले काही दिवसापासून अवैद्य वाळू उपसा वाळू माफिया करून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे तक्रार आम आदमी पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे   केली होती त्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी भीमा नदीत पात्रातून अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई केली होती .त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा वाळू माफिया यांनी नदीच्या पात्रात वाळूचे मोठ्या प्रमाणात उपसा करून वाळूची वाहतूक केली जात होती याची माहिती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली होती.

त्यांनी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी  व शासनाचा महसूल बुडत असल्याने त्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस पथक नेमून वाळू चोरी होत असलेल्या ठिकाणी पाठवले, यावेळी नदीच्या पात्रात असलेले एम एच १३ सी यु ७०५१ या क्रमांकाचे वाहन सरकोली येथून पुळूज कडे वाळू घेऊन जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते ,च्या वाहनाला अडवून पोलिसांनी बत्तीस हजार रुपयाची चार ब्रास वाळू व बारा लाख रुपयांचे वाहन जप्त केले, याप्रकरणी वाहन मालक ज्ञानेश्वर रामचंद्र भोसले (वय ३८ ),वाहन मालक वैभव शिवाजी भोसले दोघे रा. (सरकोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ही कारवाई पोलीस कर्मचारी पंजाब सुर्वे ,  हनुमंत भराटे, शिवशंकर हुलजंती यांनी केली आहे.