पंढरपूर नगरपरिषद मध्ये' शहराच्या विकासासाठी आलेल्या पैशाचा "सावळा गोंधळ ;अधिकाऱ्यांनीच केल्या ठेकेदार यांच्या संगनमताने ज्यादा दराने निविदा मंजूर - संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांचा खळबळजनक आरोप

पंढरपूर नगरपरिषद मध्ये' शहराच्या विकासासाठी आलेल्या पैशाचा "सावळा गोंधळ ;अधिकाऱ्यांनीच केल्या ठेकेदार यांच्या संगनमताने ज्यादा दराने निविदा मंजूर - संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांचा खळबळजनक आरोप

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज ) : महाराष्ट्र शासनाने पंढरपूर शहराच्या विकासासाठी सुवर्ण जयंती नगरोउत्सव अभियान महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अभियान, नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा अभियान व अंतर्गत शहरातील   नागरिकांचा विकास आरोग्य अशा विविध कारणासाठी तातडीचा विकास निधी दिल्यामुळे नगर परिषदेने त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. सदर नोटीस ही नगरपरिषदेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या किंवा कायम पोसलेले ठराविक कायमस्वरूपी ठेकेदार व नगरपरिषदेचे अधिकारी यांच्या अर्थपूर्ण संगनमताने ज्यादा दराने निविदा मंजूर करून नगर परिषदेच्या पैशाची लूट करण्याचा प्रयत्न प्रशासन व मुख्य अधिकारी हे करीत असल्याचा घनाघाती आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

याबाबत पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील विविध कामासाठी काढलेल्या निवेदन जादा दराने मंजुरी देऊन नागरिकांची लूट करू नये याची दक्षता घ्यावी .पूर्वीच्या दराप्रमाणे विविध कामांना मंजुरी देण्यात यावी असे लेखी तक्रार माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी नगर परिषदेचे प्रशासक अधिकारी तथा प्रांत अधिकारी गजानन गुरव तसेच नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांच्याकडे केली आहे. सदर निविदा टेंडर हे ठराविक  तेच - तेच ठेकेदार यांच्या संगणमताने निविदा आजपर्यंत भरत असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेमध्ये ठेकेदार ,अधिकारी व पदाधिकारी यांची अर्थपूर्ण मैत्री आज पर्यंत पहावयास मिळत आहे . यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे . भ्रष्टाचार होत असल्याने पंढरपूर शहराचा विकास होणे ऐवजी खुंटला आहे.

आता तरी नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने ज्यादा दराने ठेकेदाराला ठेका देणे बंद होईल अशी पंढरपूर शहरातील नागरिकांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करीत आहे. कारण आमदार फंडातील निविदाना मंजुरी देताना जादा दराने आलेल्या निविदा जादा दराने मंजूर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वरील कामांच्याही निविदा इस्टिमेट दराप्रमाणे मंजूर करण्यात याव्यात .अशी मागणी करून सदरील नगरपरिषदेच्या निविदा इस्टिमेट जरापेक्षा ज्यादा दराने तसेच शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता ज्यादा दराने मंजूर केल्याचे निदर्शनास आल्यास नगर परिषदेचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार  ,नगर परिषद अधिकाऱी  मिळून अर्थपूर्ण मैत्री असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक घाडगे यांनी संशय व्यक्त केला आहे.

तसेच नगरपरिषदेच्या पैशाची लूट करण्याचा प्रयत्न प्रशासन व मुख्य अधिकारी करत आहे .शासनाच्या पैशाची नगरपरिषदेने इस्टिमेट प्रमाणे निविदा मंजूर करण्यात यावी तसे न केल्यास या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर शहर वासीयाच्या  वतीने नगर परिषदेसमोर जन आंदोलन उभा करण्यात येईल .असा खणखणीत इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी आपल्या लेखी पत्रात प्रशासनास दिला आहे.