डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम पंढरपूरात संपन्न..
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत ( आबा )पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महागायक आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून नागरिकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी आपला सहभाग नोंदवून विक्रमी गर्दी केली होती.
पंढरपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आदर्श शिंदेच्या गाण्यांवर ठेका धरला होता. कार्यक्रमास माजी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे आवर्जून उपस्थित होते .चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या खांद्यावर महात्मा जोतिराव फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांची एकत्रित जयंती पंढरपुरात पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने भरगच्च कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात आले होते त्यामुळे अभिजीत पाटील हे त्यांच्या काही ना काही सामाजिक उपक्रमामुळे शहर व तालुक्यातील जन माणसांमध्ये समरस झाल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे त्यांची पंढरपूर शहर तालुक्यात चांगलीच वाढती क्रेझ निर्माण होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.