पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान पालवी प्रकल्पामध्ये सिमोलंगनाचे आयोजन..

पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान पालवी प्रकल्पामध्ये सिमोलंगनाचे आयोजन..

_________________________

पंढरपूर;(प्रतिनिधी):-पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान द्वारा संचलित पालवी मध्ये बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ येथे दसरा सिमोलंगन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पालवी प्रकल्पाच्या संचालिका सौ .मंगलताई शहा यांनी दिली.

मुले ही अशक्त असतात याची प्रतिकारशक्ती कमी असते यांच्या क्षमता आपण कमीच असतात आम्ही सर्वजणच ऐकत होतो हा भिरभिरत आलेला दगड जिवावरी लागला व आमच्या आमच्या पण मग आम्ही ठरवलं दाखवायचंच आमच्या क्षमता काय व कष्ट करण्याची किती ताकद माणूस किती जगला यापेक्षा तो कसा झाला हे महत्त्वाचं आहे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम निकाला ग्रुप नंतर शिवकालीन मर्दानी खेळ शिकलो व शिकवत आहेत आम्ही दिनांक १५ ऑगस्ट २६ जानेवारीला कर्तव्य पद वरचे संशोधन पाहतो नक्कीच एक दिवस जाणार आहे आम्ही कर्तृत्व पथावर पण आधी निघालोच शिवतीर्थावर शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला आपणही आवर्जून या आम्हाला आशीर्वाद द्यायला आमची मर्दानी खेळ बघायला ज्यामध्ये लाठीकाठी दांडपट्टा एनसीसीच्या धर्तीवर संचलन इत्यादी भरगच्च कार्यक्रम आमच्या संस्थेकडून आयोजित करण्यात आले आहेत.

तरी सिमोलंगन हे खूप महत्त्वाचा आहे आम्ही ही समक्ष आहोत हे दाखवण्यासाठी पालवी परिवारासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्यावा व हजारोच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संगोपन प्रकल्प संचालिका सौ .मंगलताई शहा यांनी केले आहे.