करमाळा वाचनालय संघ यांच्या वतीने डाॅ.सिध्देश्वर सरडे यांचा सत्कार....
------------------------------------------------------------------------------------
ग्रंथालय पधाधिकाऱ्याच्या मुलाने मारली बाजी... सिद्धेश्वर सरडे यांची एम.बी.बी.एस. ला झाली निवड
------------------------------------------------------------------------------------
करमाळा (पंढरी नगरी न्यूज ) तालुका करंजे येथील रहिवासी शहाजी सरडे सर यांचे बोरगाव ता. करमाळा येथे कौशल्या सरडे सार्वजनिक वाचनालय असून शहाजी सरडे हे या वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत ,अत्यंत उत्कृष्ट रीतीने ते वाचनालय चालवत असून त्या पद्धतीनेच त्यांनी आपला मुलगा सिद्धेश्वर यांच्यावर संस्कार घडविले आहेत, त्याचे चीज म्हणून सिद्धेश्वर ने ही जिद्द व चिकाटीच्या जोरावर निटचा अभ्यास करून परभणी येथील कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. ला निवडीस पाञ ठरला आहे, या निवडीनिमित्त करमाळा वाचनालय संघ करमाळा यांच्यावतीने डॉ. सिद्धेश्वर सरडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांचे वडील शहाजी सरडे सर यांचाही या निमित्त गौरव करण्यात आला. डॉ. सिद्धेश्वर सरडे यांचा सत्कार वर्ड कॅम्पुटर सेंटरचे संस्थापक दिलीप क्षीरसागर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर शहाजी सरडे सर यांचा सत्कार निवृत्त वाहक संजय हांडे यांचे शुभ हस्ते करण्यात आला. निवडीचे करमाळा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
*या कार्यक्रम प्रसंगी संजय मोरे कात्रज, विश्वास पाटील फिसरे, शिंदे सर जातेगाव, डॉ.अशोक शेळके अंजनडोह, भास्कर पवार रावगाव, संदीप नवले पोमलवाडी, भरत सरडे सर करंजे, नामदेव भोगे अर्जुननगर, नाना पाटील करमाळा, डॉ. कांबळे करमाळा, हर्षद मोरे इ.नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रास्ताविक भास्कर पवार यांनी तर आभार डॉ. अशोक शेळके यांनी मानले.