माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त सप्ताहात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर

माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त सप्ताहात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर

------------------------------------------------------------------------------------*

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

या निमित्त प्रभाग क्रमांक १५ च्या वतीने माजी नगरसेवक विजय वरपे व सुधाकर बदंपट्टे यांनी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये प्रभागातील १६२ नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली.यामध्ये ३७ मोतीबिंदू असणाऱ्या व्यक्तींची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी नगरपालिका गटनेते संग्राम अभ्यंकर शिवाजी अलंकार, रिपाइं नेते जितेंद्र बनसोडे, अण्णा ऐतवाडकर, मोहन शिंदे, मुकुंद मागाडे , अमित कसबे, ॲड.महेश कसबे, शैलेश धोत्रे, सुजित बनसोडे ,अण्णा काळे,योगेश घोडके, पंकज गळीतकार,दिंगबर बदंपट्टे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

साधु वासवाणी मिशन संचलित इनलॅक्स बुधराणी आय हॉस्पिटल आणि त्यांचे वैद्यकीय टीम यांचे सहकार्य लाभले.