निशिगंधा सहकारी बँकेची खातेदारांना खास आँफर विविध योजनेचा "दिवाळी धमाका"

-------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या विविध आकर्षक योजनांचा खातेदारांना दीपावली सणा निमित्त राबविण्यात येणाऱ्या "दिवाळी धमाका ,या योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असल्याची माहिती निशिगंधा सहकारी बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्के यांनी दिली .

पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गजानन महाराज मठाजवळ असणाऱ्या निशिगंधा सहकारी बँकेच्या वतीने दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर खातेदारांना त्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास होण्याकरिता विविध आकर्षक योजना देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. बँकेच्या ठेवीदारांना  ठेवी वर आठ टक्के व्याजदर दिले जाणार आहे बँकेच्या खातेदारांना तातडीने पैसे मिळण्याकरता सोने तारण व त्यावर कर्ज मिळण्यासाठी त्यावर दहा टक्के व्याजदर  आकारले जाणार आहेत. पाच लाख रुपये पर्यंत ठेवींना विमा संरक्षण आहे. तसेच ठेवीवर दरमहा, तिमाही, सहमाही किंवा वार्षिक व्याज मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

संचालक मंडळाने खातेदारांसाठी बँकेची लखपती योजना सुरू केली असून खतेदारांनी महिन्याला फक्त ३८३५ रू भरल्यानंतर त्यांना दोन वर्षांनी एक लाख रुपये मिळणार आहेत. बँकेच्या वतीने शहरी व ग्रामीण करून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करून स्वतःची प्रगती करण्यासाठी त्यांना त्वरित कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता बँकेने इतर बँके प्रमाणे शासनाच्या नियमानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक  विकास महामंडळाकडून अनेक गरजू बेरोजगारांना प्रकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

सदर योजने अंतर्गत आज पर्यंत बँकेने जवळपास १५० तरुण बेरोजगारांना रु. एक कोटी रुपयांचा व्याज परतवा मिळवून दिलेले आहे. आणि त्याचा मोठा फायदा बेरोजगारांच्या प्रगतीत झाली असून आजही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास  महामंडळाची प्रकरणे मंजुर करण्याकरिता बेरोजगारांना कडून प्रस्ताव मागविण्यात येतआहेत तसेच शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना बँकेने कोविडच्या संसर्गजन्य च्या काळात बँक कर्मचाऱ्याकडून त्यांना घरपोच रक्कम देण्याचीव्यवस्था करण्यात आली होती .

त्यामुळे घरपोच पैसे देण्याचा उपक्रम राबवल्याने निराधार लाभार्थ्यांना त्या काळात दिलासा मिळाला असून संजय गांधी निराधार योजनेच्या खातेदारांनी बँकेत आल्यानंतर आपली पासबुक कर्मचाऱ्याकडे दिल्यानंतर खातेदारांनी स्लीपवर अंगठा किंवा सही करून देऊन बाकीचे सगळी पूर्तता बँकेचे कर्मचारी करीत असल्याने निराधारांना पैसे काढण्याकरिता कोणती अडचण बँकेमध्ये येत नाही त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व निराधार विधवा योजनेतील खातेदारांनी आपली खाते या बँकेत मोठ्या प्रमाणात काढली असल्याचे बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्के सांगितले.