श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याच्या पानाची माळ
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ):- श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीस मीना राजेंद्र पाटील या भाविकांने सोन्याच्या पानाची माळ अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्रींची प्रतिमा, दैनंदिनी, दिनदर्शिका व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते.
सदर भाविक बलई ता. उरड (जि. रायगड) येथील रहिवाशी असून त्यांनी कै. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ सोने पानाची माळ (लाल खडा व रेशीम गोंड्यासह) अर्पण असून, त्याची अंदाजे किंमत 1 लाख 78 हजार होत आहे.