श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.. भाविक- भक्तांना रसनाचे मोठ्या प्रमाणात जवळ जवळ पाच हजार लोकांना वाटप
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दैनिक,पंढरी नगरी न्यूज ) - येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी सोमवार पेठ येथे वाचनालयातर्फे श्रीराम नवमी निमित्त भव्य मिरवणुकीतील भाविक भक्तांना सायंकाळी ठीक ६-०० ते ८-०० या वेळेत मोठ्या प्रमाणात जवळ जवळ पाच हजार लोकांना रसनाचे वाटप करण्यात आले. वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांच्यातर्फे रसना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, आनंद सुराणा,प्रमोद भंडारी हे उपस्थित होते.रसना वाटप करण्यासाठी श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ (श्री जैनाश्रम) बार्शी चे ऑ. सेक्रेटरी ॲड दिनेश श्रीश्रीमाळ,संचालक गौतम बोथरा जेष्ठ श्रावक मणिलाल बोथरा हे उपस्थित होते.
तसेच युवक वर्ग माणिक सुराणा,महावीर दुगड,सुजित गुंदेचा,अतुल गुगळे, किरण श्रीश्रीमाळ,पवन श्रीश्रीमाळ,रोहन श्रीश्रीमाळ,यश कुंकूलोळ,राज कुंकूलोळ,वैभव बोथरा, चि.शौर्य गुगळे,कु.शर्वरी भंडारी, निलेश वखारिया,संजय लोहिया,राहुल भंडे,भगवान डोईफोडे,देवराज व देवांश पतंगे, या युवकांनी रसना वाटप करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव व क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.