मोठी बातमी... गोपाळपूरात पत्नीवर कोयत्याने सपा - सप वार करून खून ◼️ गुन्ह्यातील आरोपीला पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात केली अटक ◼️ पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई परिसरात खळबळ
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे मागील दहा दिवसांपूर्वी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागे ऊस तोडणीसाठी जळगाव येथील तीन ते चार टोळ्या ऊस तोडीसाठी आलेल्या आहेत त्यामध्ये भानुदास आनंदा वाघ( वय 45) हा ऊसतोड कामगार त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ (वय 35 )वर्षे हिच्या सोबत व दोन मुलासह ऊस तोडी टोळी मध्ये राहत होता दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री बारा वाजता चे सुमारास यातील आरोपी भानुदास आनंदा वाघ (वय 45) रा. दरेगाव तालुका चाळीसगाव ,जिल्हा जळगाव या आरोपीने तिची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ हिला घरगुती भांडणाच्या कारणावरून ऊस तोडीच्या कोयत्याने गळ्यावर मानेवर वार सपा सप वार करून जिवे ठार मारले होते.
सदरची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना डायल 112 या क्रमांकावर मिळाल्यानंतर तात्काळ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे साहेब यांना कळवून घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक मुजावर पी एस आय वडने ,भारत भोसले ,एपीआय रेळेकर मॅडम व स्टाफअसे घटनास्थळी रवाना झाली त्यानंतर सदरचा आरोपी हा रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडाच्या मागून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागील परिसर शोध घेऊन दोन तासांमध्ये आरोपी भानुदास आनंदा वाघ (वय 45) राहणार दरेगाव ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव यास सीतापीने ताब्यात घेतले व अटक केली असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार कोयता पोलिसांनी जागीच जप्त केलेला आहे .
आरोपी हा ऊस तोडी कामगार फिरस्ता असून सदर आरोपी फरार होण्याअगोदरच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत आरोपी चे आसपासच्या परिसरात कोणीही नातेवाईक वगैरे नसून आरोपीकडे कसल्याही प्रकारचा मोबाईल क्रमांकही नसताना पोलिसांनी अतिशय तत्परतेने सदर आरोपीला खुनाच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केलेली आहे व खुनासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 100/ 26 बी एन एस कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम ,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, भारत भोसले, पोलीस ए एस आय विजय गायकवाड, हवालदार सतीश चंदनशिवे, पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे, अभिमन्यू गरड ,पोलीस कॉन्स्टेबल हजारे, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सुहास देशमुख विजय आवटी ,सागर गवळी यांच्या पथकाने केली आहे.