तारापूर येथे दारु अडड्यावर पोलिसाचा छापा.◼️ सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची कारवाई, दारूसाठ्यासह 22 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

तारापूर येथे दारु अडड्यावर पोलिसाचा  छापा.◼️ सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची कारवाई,  दारूसाठ्यासह 22 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

-----------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ):- पंढरपूर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार तारापूर (ता.पंढरपूर) येथे पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या देशी व विदेशी दारु विक्री करताना 21 हजार 530 रुपये किमंतीच्या 165 बॉटल मिळून आल्या तर रोख रक्कम 1 हजार 420 रुपये असे एकूण 22 हजार 950 -रू चा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत दत्ता किसन साबळे (वय 42) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. 11 रोजी सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यासाठी पथक पाठवण्यात आले. पोहेका रोंगे, पोका घायाळ हे तारापूर येथे पंढरपूर तारापूर रोड पत्रा शेडच्या शेजारी हिरव्या शेडनेटमध्ये गेले. तेव्हा, त्यांना दत्ता किसन साबळे रा. तारापूर हा देशी विदेशी कंपनीची दारू विकत असल्याचे मिळून आला. त्या ठिकाणी अधिक तपास केला असता पांढऱ्या पिशवीमध्ये देशी-विदेशी दारुच्या 165 बॉटल मिळून आल्या. त्याची एकूण किंमत 21530 रुपये इतकी आहे. तर देशी विदेशी दारू विकून आलेली रोख रक्कम 1420 रुपये जप्त करण्यात आली. अशी एकूण 22950 रू चा मुद्देमाल मिळून आला आहे. मुद्देमाल व आरोपी दतता साबळे यास पुढील कारवाई करिता पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरवसे यांच्या ताब्यात दिले आहे.