पंढरपूरात नागपंचमीनिमित्त श्री रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) :-नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री रुक्मिणी मातेस आकर्षक व पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले असल्याचे, व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले.