सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी म्हणून वंदना देशमुख - काटकर.
--------------------------------------------------------------------------
सोलापूर, ( दै.पंढरी नगरी न्यूज):- सोलापूर येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारीपदी वंदना देशमुख- काटकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा पदभार नुकताच त्यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित घेतला आहे . पदभार घेतल्यानंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून पुढील कामकाजास शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर बोलताना देशमुख मॅडम म्हणाल्या की, कार्यालयीन कामकाज करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगून दिशा देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथालय प्रभारी म्हणून काम करत असलेले प्रमोद पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचा प्रभारी पदभार घेऊन उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख यांची प्रथम नेमणूक नाशिक येथे झाली त्यानंतर आपल्या कामाचा ठसा उमटवून त्यानी आपल्या अनुभवानंतर पुणे, सोलापूर व लातूर या जिल्ह्यामध्ये उत्कृष्टरित्या काम करून त्यांनी केलेल्या कार्यशैलीची क्रेज निर्माण केली उत्कृष्ट कामानंतर शासनाने आजपर्यंतच्या त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांची सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारीपदी नियुक्ती केली असून त्यांचे लहानपणापासून शिक्षण शिक्षण MA Economics M.Lib & I.Sc.पुणे व सोलापूर येथे झाले आहे, नूतन जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी वंदना देशमुख मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील राजेगाव येथील रहिवासी आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख यांच्याकडे सध्या लातूर जिल्ह्याचाही अतिरिक्त पदभार सोपवला आहे.