छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधवानी जोरदार घोषणाबाजीने महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला. ◾सरकारने आरक्षणाचा त्वरित निर्णय घ्यावा .
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी १० वा .छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो मराठा समाजबांधव एकवटले, यावेळी सरकारथ्या भूमिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची गांभीयनि दखल घ्यावी, अन्यथा पंढरपुरात येणाऱ्या मंत्र्यांना प्रवेशास विरोध करण्याची भूमिका घेण्यात येईल असा स्पष्ट इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
याप्रसंगीत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात राज्यात सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजबांधवांना अर्ज केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी मागणी
करण्यात आली.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास पंढरपुरात येणाऱ्या मंत्र्यांना प्रवेशास विरोध करण्याची भूमिका घेण्यात येईल असा स्पष्ट इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
येधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. आरक्षणाच्या मागणीवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी निवेदन स्वीकारले.