पंढरपूर मराठा सेवा संघाचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना जाहीर. ◾ कर्तव्यनिष्ठ पुरस्काराचे वितरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभागृहात आयोजन.

पंढरपूर मराठा सेवा संघाचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना जाहीर.  ◾ कर्तव्यनिष्ठ पुरस्काराचे वितरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभागृहात आयोजन.


---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ):- पंढरपूर मराठा सेवा संघाचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार पंढरपूर पंचायत समितीचे अभ्यासू गट विकास अधिकारी अमोल चंद्रहार जाधव यांना जाहीर झाला असल्याचे मराठा सेवा संघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष नितीन जाधव सर यांनी सांगितले. पंढरपूर मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी समाजातील अनेक व्यक्तींना उत्कृष्ट कार्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने कर्तव्यनिष्ठ पुरस्कार देऊन संघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौरवण्यात येते शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ /३० वाजता पंढरपूर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभागृह जुन्या बस स्थानक समोर येथे भरगच्च व भव्य दिव्य हा कार्यक्रम होणार आहे पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .या कार्यक्रमास पंचायत समितीचे  सभापती शुभम आगवणे व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उत्तमराव माने हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघ पंढरपूर कार्यकारणी सदस्य सतीश रकटे हे भूषवणार आहेत. कार्यक्रमास   वाखरी जि . प च्या सदस्या मयुरी बागल , प्रसिद्ध लेखक व विचारवंत बी .एन धांडोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव धनाजी मस्के, पुणे विभागीय संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तथा नगरसेवक किरणराज घाडगे, पंढरपूर येथील श्री .विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर (बाबा) घोडके, पंढरपूर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष अनिता पवार इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थित होणार आहे त्याचबरोबर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक मोनिका खडके -पाटील, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेश कुमार सुडके, राकेश पाटकुलकर ,मीनाक्षी देशमुख डॉ.अमरजीत गोडसे, संभाजी देवकर ,गणेश तनमोर ,संतोष गायकवाड, धीरज पाटील, धनंजय धोत्रे, प्रेमनाथ माने, सोमनाथ मलपे, सोमनाथ गायकवाड तसेच शिवछत्रपती युवक मंडळ  पेहे तसेच १६ मान्यवरांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष एम .एन गायकवाड, सचिव नितीन आसबे यांनी सांगितले. कार्यक्रमास मराठा सेवा संघ कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी यांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ पंढरपूर शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.